मुलाच्या हानीकारक वर्तणूक व अयोग्य स्वभावावर शाळेच्या मुख्याध्यापकाशी विद्यार्थ्याच्या आईचे संभाषण
आई: नमस्कार, श्री सातपुते सर. मला माझ्या मुलाच्या शाळेतील हानिकारक वर्तनाबद्दल मला काही विद्यार्थ्यांकडून माहिती मिळाली. ते ऐकून मुलाच्या भवितव्याविषयी काळजी वाटते. त्याबद्दल मला तुमच्याकडून मदत आणि मार्गदर्शन हवे आहे.
मुख्याध्यापक: नमस्कार, ताई. कृपया तुम्हाला जे म्हणायचे आहे ते स्पष्टपणे सांगा. आम्ही तुम्हाला आणि तुमच्या मुलाला नक्कीच मदत करू.
आई: धन्यवाद सर! अलीकडे, माझा मुलगा इतर विद्यार्थ्यांशी आक्रमकपणे वागतो. तो इतर मुलांशी मारामारी आणि भांडणेपण करतो. त्यामुळे त्याचे शिक्षणावरून दुर्लक्ष होते आहे व परीक्षेत त्याला कमी गुण मिळत आहेत. याची मला खूप काळजी वाटते.
मुख्याध्यापक: मी तुमच्या काळजीचे कौतुक करतो. तुमच्या लक्षात आलेल्या तुमच्या मुलाच्या हानिकारक वर्तनाची काही उदाहरणे तुम्ही मला देऊ शकता का?
आई: नक्कीच. माझ्या मुलाने काही विद्यार्थ्यांसोबत मारामारी, गुंडगिरी केली आणि विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या मालमत्तेचे काही नुकसान केल्याची माहिती मला मिळाली आहे.
मुख्याध्यापक : आता मला काही प्रमाणात समजले. आमच्याकडे अशा प्रकारचे वागणे मुळीच खपवून घेतले जात नाही. या प्रकाराची सखोल चौकशी केली जाईल व त्यावर उपाययोजना केली जाईल, याची मी खात्री देतो.
आई: धन्यवाद, सर, मला असेही वाटते की माझ्या मुलाला त्यांच्या वागण्याचे परिणाम समजण्यासाठी आणि त्यांचे वागणे बदलण्यासाठी योग्य मार्गदर्शन व समुपदेशन यांची खूप आवश्यकता आहे.
मुख्याध्यापक : होय. तुमच्या मुलास अधिक चांगले वागण्याचे कौशल्य विकसित करण्यास मदत करण्यासाठी आम्ही त्याचे वर्गशिक्षक, काही विषयांचे शिक्षक व शाळेच्या समुपदेशकासोबत बैठक आयोजित करू.
आई: ते ठीक वाटते. तुम्ही हा प्रकार गांभीर्याने घेतले आणि मदत केली, याबद्दल मला समाधान वाटत आहे.
मुख्याध्यापक: आम्ही पालक आणि शाळा यांच्यातील चांगले संबंध आणि परस्पर सहकार्याला विशेष महत्त्व देतो. तुमच्या पाठिंब्याने आम्ही तुमच्या मुलाला चांगला विद्यार्थी आणि देशाचा चांगला नागरिक बनवण्यासाठी जे आम्हाला शक्य आहे ते सर्व काही करू.
आई: धन्यवाद, सर. मी तुम्हाला माझ्या मुलातील बदल आणि इतर संबंधित गोष्टींविषयी सतत कळवत जाईन आणि आवश्यक ते सर्व सहकार्य करीन..
मुख्याध्यापक: तुमचे या शाळेत केव्हाही स्वागत आहे. शाळा व विद्यार्थी यांच्या विषयी कोणत्याही वेळी तुम्ही माझ्याशी, मुलाच्या वर्ग शिक्षकांशी आणि विषय शिक्षकांशी संपर्क करू शकता. आपण सर्व मिळून शाळेचे वातावरण चांगले ठेवण्यासाठी आणि मुलाचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करूया.